क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : “चिक्कीचा बहाणा… आणि सोनसाखळी झडपडून चोरी!” लोणी काळभोर पोलिसांची चमकदार कामगिरी

Pune Police latest News: दिवसाढवळ्या किराणा दुकानात साखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा थरार; स्प्लेंडरवरून आले आणि क्षणात गायब!

पुणे | पुणे शहराजवळील लोणी काळभोर परिसरात एका साध्या किराणा खरेदीचे ठिकाण एका महिलेच्या आयुष्यातील झटक्याचे ठिकाण ठरले. चिक्की घ्यायची बतावणी करत आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी झडपडून लंपास केली आणि दुचाकीवरून पळाले. पण… गुन्हेगार कितीही चतुर असले, तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटणे अशक्य!

ही घटना 29 जून 2025 रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. पीडित महिला संगिता पंडीत बोडके (वय 48) या बोडके वस्ती येथील निलेश किराणा स्टोअरमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तेव्हा दोन अज्ञात इसम काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवर आले. चिक्की खरेदीचा बहाणा करत त्यांनी त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलीस स्टेशनने तपासाला वेग दिला. अनेक सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदारांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर दोन आरोपींचा शोध लावण्यात आला. आरोपी सचिन अर्जुन ढगे (वय 19, रा. माऊलीनगर, कात्रज) आणि रोहित राजू माने (वय 25, रा. निंबाळकर वस्ती, कात्रज) यांना अनुक्रमे 14 आणि 15 जुलै रोजी अटक करण्यात आली.

तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरलेले मंगळसूत्र व वापरलेली स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या पथकाने अतिशय कसून व कौशल्यपूर्ण तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला.

ही कामगिरी उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, निरीक्षक स्मिता पाटील, व त्यांचे संपूर्ण पथक – सातपुते, वणवे, भोसले, माने, देवीकर, कुंभार, गाडे आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0