
Pune Latest Crime News : बिबवेवाडीत पोलिसांची कारवाई; डॉक्टर पुन्हा एकदा अमली पदार्थ विक्रीप्रकरणी अडचणीत
पुणे :- शहरातील बिबवेवाडी परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एका निलंबित डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली. या तिघांकडून तब्बल ११ लाख ४३ हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, एकूण १५.८४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. Pune Latest Crime News
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे मोहम्मद उर्फ आयान जारून शेख (27 वय, उंड्री), सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (28 वय, हिंगणे खुर्द) आणि अनिकेत विठ्ठल कुडले (27 वय, नारायण पेठ) अशी आहेत. मोहम्मद शेख हा मूळचा जम्मू काश्मीरमधील असून तो एमबीबीएस डॉक्टर आहे. यापूर्वीही त्याच्यावर अमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयातून सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
बिबवेवाडीतील एका हॉटेलजवळ तिघेजण एका चारचाकीमध्ये थांबले असताना पोलिसांनी कारवाई केली. त्या वेळी त्यांच्या ताब्यातून मेफेड्रोनसह मोटार, मोबाइल संच मिळून एकूण 15 लाख 84 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे आणि संदीप शिर्के यांच्या पथकाने केली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे आणि संदीप शिर्के यांच्या पथकाने केली.
या मेफेड्रोनचा पुरवठा नेमका कुणाकडून झाला, आणि तो कुणाला विकला जाणार होता, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे समजते.



