ठाणेमुंबई
Trending

Pravin Gaikwad : भाजप नेत्यांनीच हल्ला घडवून आणला! – प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप

Pravin Gaikwad On BJP : “दीपक काटेच्या पाठीशी बावनकुळे आणि फडणवीस”, “माझ्यावरचा हल्ला म्हणजे सरकारप्राय कट – संभाजी ब्रिगेडचा आरोप”

मुंबई | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड Pravin Gaikwad यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना थेट कटाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेत गायकवाड यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना “हल्ल्याचे मास्टरमाइंड” ठरवत खळबळ उडवून दिली आहे.

गायकवाड म्हणाले, “दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बावनकुळे आणि फडणवीस यांचे पाठबळ असल्यामुळेच त्याला जामीन मिळाला. माझ्यावरचा हल्ला पूर्वनियोजित होता. हे सरकारप्राय षड्यंत्र आहे.”

त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ दाखवत दावा केला की, “चंद्रशेखर बावनकुळे स्वतः जाहीर सभेत म्हणाले की – ‘माझं आणि देवेंद्र भाऊंचं पाठबळ तुझ्या मागे आहे.’ मग असा गुन्हेगार आज मुक्त कसा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याप्रकरणी गायकवाड यांनी पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, “अक्कलकोटचे तपासाधिकारी हेच बावनकुळे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे काटेवर मकोका लागू न होता त्याला जामीन मिळवून देण्याचा डाव रचण्यात आला.”

प्रवीण गायकवाड यांनी भाजप-संघावर बहुजन विचारवंतांवर हल्ला करण्याचा इतिहास असल्याचा आरोप करत, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला. “महात्मा गांधींचा मारेकरी उदात्तीकरण करणाऱ्या संघटनांकडूनच हा कट रचला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0