मुंबईठाणे
Trending

Vasai Virar News : दारूवरील करवाढीविरोधात राज्यभर बार बंद; वसई-विरारमधील 312 हॉटेल्सचा एकदिवसीय संप

Vasai Virar Latest News : व्हॅट, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कवाढीचा निषेध; सरकारला बेमुदत संपाचा इशारा

मिरा रोड :- महाराष्ट्र सरकारने मद्यावर केलेल्या करवाढीविरोधात राज्यभरातील बार आणि परमिट रूम चालक सोमवारी एकवटले. वसई तालुका हॉटेल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वसई-विरार परिसरातील 312 हॉटेल्स, बार व परमिट रूमनी एकदिवसीय संप पुकारत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. या संपामुळे शहरातील सर्व मद्यविक्री बंद राहिल्याने ग्राहकही गैरसोयीला सामोरे गेले. Vasai Virar Latest News

राज्यभरात जवळपास 20 हजार बारचालक संपात सहभागी झाले असून, मद्यविक्रीवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) 5% वरून 10%, परवाना शुल्कात 15% आणि उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ झाल्याचा बारमालकांनी तीव्र विरोध केला आहे.

वसई तालुका हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रीतम सिंह गोहोनिया यांनी सांगितले की, “अत्याधिक करवाढीमुळे व्यवसाय धोक्यात आला आहे. सरकारने तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा बेमुदत संपाची हाक देण्यात येईल.” त्यांनी ब्रिटिशकालीन नियमांचे अद्ययावतीकरण करण्याचीही मागणी केली.

उपाध्यक्ष भरत शेट्टी यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत सांगितले की, “महागाईमुळे ग्राहकांचा कल अवैध दारूविक्रीकडे वळत आहे. अधिकृत व्यवसाय थांबत आहे, आणि बेकायदेशीर व्यापार वाढतो आहे.”

या संपाचाच भाग म्हणून मिरा-भाईंदर परिसरातील बार आणि हॉटेल व्यावसायिकांनीही कामबंद आंदोलन पुकारलं. संतोष पुत्रण यांनी सोशल मीडियावरून सांगितले की, “राज्य सरकारपर्यंत आमचा आवाज पोहचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. हॉटेल उद्योगातून रोजगार, पर्यटन आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळते. ही घडी सरकारने योग्य धोरणे आखण्याची आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0