क्राईम न्यूजमुंबई
Trending

Vasai Cyber Crime : इंस्टाग्राम लिंकवर क्लिक , 3.76 लाख रुपयांची फसवणूक! सायबर पोलिसांनी अखेर परत केली संपूर्ण रक्कम

Vasai Share Market Fraud News : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अडकवून बनावट अ‍ॅपद्वारे केली गुंतवणूक; सायबर पोलीस ठाण्याच्या सततच्या पाठपुराव्याला यश

वसई | शेअर ट्रेडिंगच्या Share Market Trading नावाखाली इंस्टाग्रामद्वारे प्राप्त लिंकवर क्लिक केल्याने एका नागरिकाची तब्बल 3 लाख 73 हजार 500 रुपयांची फसवणूक झाली. मात्र या आर्थिक धक्क्याच्या काळात सायबर पोलीस ठाण्याने धैर्य दाखवून बँक, न्यायालय आणि तांत्रिक पद्धतीचा वापर करत ही रक्कम पुन्हा मूळ खात्यात परत मिळवून दिली. Vasai Latest Cyber Crime News

वसई पोलिस ठाणे हद्दीतील तक्रारदार यादव यांना इंस्टाग्रामवर शेअर ट्रेडिंगसाठी लिंक प्राप्त झाली. लिंकवर क्लिक करताच ते एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अ‍ॅड झाले. या ग्रुपमधील व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी एक बनावट अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली.

पण गुंतवलेली रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न करताच अधिक पैसे भरण्याची मागणी होऊ लागली, त्यावेळी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी गुन्ह्याची रक्कम संशयित बँक खात्यात थांबवून ठेवली. तक्रारदारांच्या अर्जानंतर न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आणि न्यायालयाच्या आदेशाने रक्कम मूळ खात्यात परत करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांनी केले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव धनवडे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, विलास खाटीक, राजेश भरकडे यांनी मोलाचे योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0