मुंबई

Tinder App Fraud : टिंडरवर फसवणुकीचा ‘डेटिंग ट्रॅप’; तरुणाला मसाजच्या आमिषाने घरात बोलावून डांबले, खंडणी व सोनं हिसकावलं!

•Mira Road Crime News महिलेच्या नावाने टिंडरवर बनावट प्रोफाइल, कॉफीचं आमंत्रण, आणि मग सुरू झाली फसवणुकीची गुंगी

मिरारोड | ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपवर ‘फ्रेंडली’ वाटणारी ओळख एका तरुणासाठी भीषण अनुभवात बदलली. टिंडर अ‍ॅपवर मैत्री करून खंडणी उकळणाऱ्या टोळीने त्याला घरात डांबून ठेवत, मारहाण, धमकी देत सोन्याची साखळी हिसकावून 3.45 लाख रुपये उकळले. Mira Road Crime News या घटनेचा धक्कादायक पर्दाफाश खंडणी विरोधी पथकाने केला असून दोन आरोपी अटकेत आहेत.

सागर रावल नावाच्या युवकाने महिलेच्या नावाने टिंडरवर बनावट अकाऊंट तयार करून पीडित तरुणाशी संपर्क साधला. चॅटिंगनंतर त्याला “कॉफी भेट”च्या बहाण्याने ‘बरीस्ता कॉफी शॉप’ला बोलावण्यात आले. तेथून महिलेने त्याला मसाज करण्याचे आमिष दाखवून ‘अपना घर, हाटकेश, मिरारोड’ येथे नेले.

त्याठिकाणी तरुणाच्या गळ्यातील साखळी काढून, त्याच्या ओळखीच्या सोनाराकडे जाऊन विकण्यात आली आणि त्यातून तब्बल 3.45 लाख उकळले. Mira Road Crime News एवढ्यावरच न थांबता, टोळीतील चार अनोळखी इसमांनी रुममध्ये घुसून त्याच्यावर शारीरिक हल्ला, “बदनामी करू” अशी धमकी, आणि “तुला लग्नाचा खर्च द्यावा लागेल, 10 लाख रुपये दे” अशी खंडणी मागितली.

पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. समांतर तपास करत खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी सायबर विश्लेषण, मोबाईल ट्रॅकिंग व गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे.सागर रमेश रावल (वय 26, रा. अपना घर, फेज-2, मिरारोड),रुषभ देवेंद्र शिंदे (वय 25, रा. वागळे इस्टेट, ठाणे) त्यांच्याकडून 1.48 लाखांचे मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले. तपासात त्यांचे इतर सहकारी पाजी, सोनू शेख आणि एक महिला आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यामध्ये खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या नेतृत्वाखालील पथकातील खालील अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, विजयेंद्र आंबवडे, ओंकार कोचे, शकील पठाण,पोलीस हवालदार व शिपाई: राजवीर संधू, राजाराम काळे, सतिश जगताप, सुनिल गोमासे, शरद पाटील, अनिल नागरे, अकिल सुतार, साकेत माघाडे सायबर पो.ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी कारवाई केली आहे. Mira Road Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0