Pune Spa Sex Syndicate | सेक्स सिंडीकेटचे आका ‘रहिम-अमित’ यांचे इंटरनॅशनल कनेक्शन?

- Pune Spa Sex Syndicate | विमानतळ येथील मेंशन स्पा रेड मधून धक्कादायक माहिती उजेडात
पुणे, दि. 11 जुलै, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Pune Spa Sex Syndicate | Maharashtra Mirror Exclusive
पुणे शहरातील उच्च भ्रू विमानतळ परिसरात स्पाच्या नावाखाली चाललेल्या हाई-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी भांडाफोड केल्यानंतर आता धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. पुणे शहर व उपनगरात चाललेल्या हाई प्रोफाईल सेक्स रॅकेटचे सिंडीकेट याच आकांकडून हाताळले जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आका रहिम-अमित यांचे सेक्स सिंडीकेट इंटरनॅशनल असून थेट थायलंडपर्यंत त्याचे धागेदोरे असण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील अवैध धंद्यांना समुळ नष्ट करणारे धडाकेबाज पोलीस आयुक्त अमितेश कुमार या आकांच्या सेक्स सिंडीकेटला मोडण्यासाठी मोठे पाऊल घेण्याची शक्यता आहे. Pune Spa Sex Syndicate, Pune Crime News

एकाच स्पा सेंटरमधून 10 परदेशी तरूणी मिळणे धक्कादायक
विमानतळ येथील मेंशन स्पा येथे पुणे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 10 परेदशी तरूणी आढळून येणे ही चिंताजनक बाब आहे. यात आणखी महत्वाचे म्हणजे 10 तरूणी थायलंडच्या असल्याने सेक्स सिंडीकेट इंटरनॅशनल लेवलवर हाताळले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी यात आणखी तपास केल्यास अनेक धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. Pune Spa Sex Syndicate
व्यवस्थापकाला समोर करून आका पाठमोरा…
स्पा सेंटर चालविण्यासाठी आका रहिम-अमित व्यवस्थापकाला समोर करून स्वतः पाठमोरे राहत असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशा प्रकारे पुणे शहरात अनेक ठिकाणी यांचे नेटवर्क असून व्यवस्थापकाला बळीचा बकरा करून हे सिंडीकेट मोठ्या शिफातीने चालविले जात आहे.
रहिम-अमितचे कनेक्शन तपासले जाणार?
मेंशन स्पाच्या निमित्ताने रहिम-अमितचे नाव समोर आल्यानंतर या आकांची तपासणी पोलिस प्रशासनाकडून होणार का? त्यांची नावे गुलदस्त्यातच ठेवण्यात येणार हे पहावे लागणार आहे.



