मुंबई

Sanjay Shirsat : पैशांच्या बॅगेवरून राजकारण तापले! संजय शिरसाट म्हणाले, ‘ते माझे कपडे आहेत’

•“संजय राऊत रोज भुंकतात, गेलेली सत्ता त्यांना झोपू देत नाही” – शिरसाटांचा पलटवार

मुंबई | शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामध्ये ते त्यांच्या बेडरूममध्ये सिगारेट ओढत फोनवर बोलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बेडखाली एक मोठी बॅग ठेवलेली असून, या बॅगेवरून विरोधकांकडून आरोपांची मालिका सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या व्हिडीओच्या आधारे शिरसाटांवर टीका करत “मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत,” असा घणाघात केला.

मात्र, संजय शिरसाट यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “व्हिडीओ माझ्या घराचा आहे. माझ्या बेडरूममधला आहे. ही बॅग कपड्यांची आहे, पैशांची नाही. एवढ्या मोठ्या बॅगेत पैसे कोण ठेवतो? अलमारी मेलीय का?” असा सवाल शिरसाट यांनी केला.

तसेच संजय राऊतांवर बोचरी टीका करत शिरसाट म्हणाले, “राऊत रोज ठरल्यासारखं भुंकतात. एकनाथ शिंदे सकाळी उठले की ते बोलतात, संध्याकाळी झोपले तरी तेच बोलतात. त्यांना गेलेली सत्ता शांत बसू देत नाही.”

शिरसाटांनी स्पष्ट केलं की, व्हिडीओ मतदारसंघात काढण्यात आला असून त्यात काहीही बेकायदेशीर नाही. “मी कार्यकर्त्यांसाठी नेहमी खुले आहे. कुणालाही चिठ्ठी देऊन आत बोलावलं जात नाही. हेच आम्ही शिवसेनाप्रमुखांकडून शिकलो,” असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0