Navi Mumbai Police : राजस्थानच्या सायबर टोळीचा पर्दाफाश; BFSLMAX आणि UPINSTITON अॅपवरून बनावट परताव्याचं आमिष; दोन आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Navi Mumbai Police Arrested Cyber Criminal : 2 कोटी 99 लाखांची फसवणूक उघड; आरोपींकडून मोबाईल, डेबिट कार्डसह बोगस कागदपत्रांचा मोठा साठा जप्त*
Navi Mumbai : नवी मुंबई सायबर पोलिसांनी Navi Mumbai Cyber Crime Branch ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 2 कोटी 99 लाख रुपयांची फसवणूक उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी Bajaj Financial Securities Limited आणि UPSTOX यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या नावाचा गैरवापर करून बनावट अॅप्सद्वारे गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. Navi Mumbai Latest News
फिर्यादींकडून BFSLMAX आणि UPINSTITON या अॅपवरून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. आरोपींनी बनावट कागदपत्रं, लोगो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारदारांचा विश्वास संपादन करत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरायला लावले. यामधून 2 कोटी 20 लाख 70 हजार आणि 78 लाख 63 हजार रुपये अशा दोन स्वतंत्र तक्रारींमध्ये मोठी रक्कम लुबाडण्यात आली होती.
सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात पुणे आणि मुंबईत राहणारे दोन आरोपी – तुषार साळुंखे (रा. पुणे) व मुकेश कुमार (मूळ रा. राजस्थान) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 7 मोबाईल फोन, 15 डेबिट कार्ड, 9 चेक बुक, पासपोर्ट, पॅन कार्ड व बनावट स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, आणि गुन्हे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या टीमने केला.आरोपींचे इतर साथीदार राजस्थानात असल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना सायबर पोलिसांचे आवाहन –
सामाजिक माध्यमांवरून मिळणाऱ्या शेअर ट्रेडिंग संदर्भातील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि वैयक्तिक माहिती वा पैसे शेअर करू नका.


