क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Bhayandar News : मीरा रोडमधील मराठी अस्मिता वादानंतर पोलिस आयुक्तांची बदली!

MBVV Police Chief Madhukar Pandey Transferred  : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, मधुकर पाण्डेय यांना हटले; निकेत कौशिक यांची नेमणूक

मुंबई | मीरा रोड येथे मराठी अस्मितेवरून झालेल्या वादानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) येथील पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय यांची तात्काळ बदली केली आहे. MBVV Police Chief Madhukar Pandey Transferred त्यांच्या जागी 1995 बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय मराठी अस्मिता मोर्च्याला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.

मीरा रोड परिसरात एका व्यापाऱ्याला मराठी न बोलल्याने मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर वातावरण चांगलेच तापले. या घटनेनंतर काही गैर-मराठी दुकानांनी दुकाने बंद ठेवली होती, त्यानंतर मनसे आणि इतर संघटनांनी मराठी अस्मिता मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला, मात्र पोलिसांनी याला परवानगी नाकारली. या निर्णयावरून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.

मोर्च्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी “मी आधी मराठी माणूस आहे, नंतर मंत्री,” असे ठाम विधान करून पोलिसांच्या कारवाईवर टीका केली होती. मात्र आंदोलनस्थळी त्यांच्यावरही काही संतप्त नागरिकांनी “गद्दार” अशी हाकाटी करत विरोध केला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, रॅलीस परवानगी दिली होती, पण आयोजकांनी निवडलेला मार्ग वादग्रस्त असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर सरकारने तात्काळ कारवाई करत पांडे यांची बदली करून कौशिक यांना नवे आयुक्त म्हणून नेमले आहे.

दरम्यान, व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अद्याप अटक न झाल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार्जशीट न्यायालयात दाखल केली असून, दोषी ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडेच असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0