Mumbai Crime News : ‘मकोका’च्या कक्षेत आता ड्रग्स माफिया; महाराष्ट्रात कठोर कारवाईचा मार्ग मोकळा

•Mumbai Latest Crime News : अंमली पदार्थ विक्री व तस्करी आता ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा; विधेयकाला विधानसभेची मंजुरी
मुंबई | राज्यात अंमली पदार्थांच्या साखळीला आळा घालण्यासाठी आता आणखी कठोर पावले उचलली जात आहेत. अमली पदार्थांची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यास विधानसभा मंजुरी दिली आहे. यामुळे ड्रग्ज माफियांविरोधात Drug Sumggler पोलिसांना अधिक प्रभावी आणि कडक उपाय करता येणार आहेत. Mumbai Police Latest News
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे सुधारित विधेयक विधानसभेत सादर केले. त्यानुसार, मकोका लागू करण्यासाठी पूर्वी ज्या हिंसक कारवायांचा अट होती, ती शिथिल करण्यात आली असून आता अमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींवरही थेट मकोका लावता येईल.
पाच वर्षांत 73 हजार गुन्हे, 10 हजार कोटींचा ड्रग्स जप्त; सरकारच्या पातळीवर मोठा निर्णय
राज्यात गेल्या पाच वर्षांत अंमली पदार्थांच्या प्रकरणात तब्बल 73 हजार गुन्हे दाखल झाले असून सुमारे 10 हजार कोटी रुपये किंमतीचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. हे प्रमाण लक्षात घेता, यापुढे या गुन्यांना सामोरे जाण्यासाठी ‘मकोका’सारख्या कडक कायद्याची गरज होती, असे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
तस्करी आणि विक्रीविरोधात यापूर्वी ‘एनडीपीएस’ कायद्यानुसार कारवाई होत होतीच, पण आता मकोकाच्या कठोर तरतुदी लागू केल्याने हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र, मकोका लागू करण्यासाठी पोलिस आयुक्तांची मंजुरी आवश्यक असेल.
या विधेयकावर झालेल्या चर्चेत आमदार अमित साटम, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दटके आदींनी सहभाग घेतला आणि हे विधेयक एकमताने संमत झाले.


