क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

Suresh Dhas : आमदारपुत्राच्या भरधाव कारची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू!

Beed Accident News : सुपा परिसरात रात्री उशिरा भीषण अपघात; नितीन शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू

पुणे | सत्ताधारी आमदाराचा मुलगा, भरधाव कार, आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू… ही सगळी घटना एका क्षणात घडली. सोमवारी (7 जुलै) रात्री 10.30 च्या सुमारास, बीड जिल्ह्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या Supa Police Station हद्दीत भीषण अपघात झाला. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत नितीन शेळके (वय अंदाजे 30) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही धडक एवढी प्रचंड होती की, दुचाकी अक्षरशः 20-30 फूट दूर फेकली गेली, आणि शेळके यांना काहीही शुद्धीवर येण्याची संधीच मिळाली नाही. सागर धस पुण्याच्या दिशेने जात असताना, कामरगाव परिसरात ही जीवघेणी घटना घडली.

सुपा पोलीस ठाण्याकडून अपघातप्रकरणाचा तपास सुरू असला तरी राजकीय वजनामुळे तपासाला ब्रेक लागेल का?, असा सवाल संतप्त नागरिक विचारू लागले आहेत. घटनास्थळी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आमदार सुरेश धस यांचे पुत्र असल्यामुळे सागर धस यांच्यावर कोणताही दबाव न आणण्याची शक्यता नागरिकांना सतावत आहे. आष्टी व बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.”कायद्याचं राज्य असेल, तर मग दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी अनेकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0