क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Drug Racket : डोंबिवलीत अंधारात सुरु असलेली ड्रग्सची खतरनाक ‘सौदेबाजी’पोलिसांनी उधळून लावली

Dombivli Latest Drug Racket Busted News : आयव्हरी कोस्टचा नागरिक अटकेत; 2.12 कोटींचा मेफेड्रॉन ताब्यात, शहरात खळबळ

डोंबिवली | डोंबिवली शहरात ड्रग्ज रॅकेटवर Dombivli Drug Racket मानपाडा पोलिसांनी Manpada Police जोरदार घाव घालत 2.12 कोटी रुपयांचा ‘मेफेड्रॉन’ (एमडी) पकडत परदेशी तस्करास अटक केली आहे. रात्री 10.50 वाजता, निळजे गावातील तलावाजवळ सुरू असलेल्या अंमली सौदेबाजीत पोलिसांनी थेट धाड टाकली आणि एक ‘इंटरनॅशनल ड्रग्ज लिंक’ उजेडात आणली. Dombivli Latest Crime News

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे इसा बकायोका (37 वय), मूळचा आयव्हरी कोस्टचा रहिवासी, सध्या तो निळजे परिसरात वास्तव्यास होता. त्याच्याकडून 1.51 किलो एमडी जप्त करण्यात आले असून याची बाजारमूल्य 2 कोटी 12 लाखांहून अधिक असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

फरहान शेख रॅकेटचा धागा, बेंगळुरूमधून आलेल्या गाडीने फोडला गुन्हा!

सदर कारवाई ही 27 जून रोजी झालेल्या 2 कोटी रुपयांच्या एमडी जप्तीच्या तपासाचा भाग आहे. त्या प्रकरणात अटक आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब सलीम शेख याच्याकडून मिळालेल्या सुरागांवरून पोलिसांनी नवी मुंबई परिसरात सघन तपास सुरू केला होता. तपासादरम्यान निळजे येथील सौदेबाजीची खबर मिळताच, पोलिसांनी अचूक नियोजन करीत कारवाई केली.

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर बव्हाण, अपर आयुक्त संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0