Lok Sabha Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
Raj Thackeray Amit Thackeray Delhi Tour : राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता, भेटीनंतर राज ठाकरे मुंबईकडे रवाना
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांचे दिल्लीत भेट घेतली. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी Lok Sabha Election 2024 राज ठाकरे महायुती सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. आजची भेट लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती सहभागी झालीस किती जागा मिळण्याची शक्यता आहे परत कोणत्या कोणत्या जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दावा केला जात आहे हे पाहण्या उत्सुकता ठरले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत घेण्याच्या घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या येथील निवासस्थानी पोहोचलेत. तिथे त्यांची भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांसह शहांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत मनसेच्या महायुतीच्या प्रवेशाचा ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. असे खरेच घडले तर तो महाविकास आघाडीला मोठा झटका असेल असे मानले जात आहे.
तीन जागेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाकडे प्रस्ताव
बाळा नांदगावकरांना शिर्डीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता दरम्यान, मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या 3 पैकी किमान 2 लोकसभा मतदारसंघांची मागणी केली. या तिन्ही जागा शिंदेसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संमतीही घेण्यात आली. मात्र दक्षिण मुंबईची जागा भाजपला हवी आहे. शिंदेसेना नाशिक सोडणार नाही. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होऊ शकते. यावर दिल्लीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
खासदार संजय राऊत यांची टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी- शहांची मदत केली तर राज्याच्या इतिहासात त्यांची नोंद महाराष्ट्र द्रोही म्हणून केली जाईल, अशी जळजळीत टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज यांच्या दिल्ली दौऱ्याचा समाचार घेताना केली आहे.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी शिवसेना फोडली. पण त्यांना कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे आता त्यांना आमची मते फोडायची आहे. यासाठी ते दिल्लीत जमलेत. महाराष्ट्रातून गेलेल्या नेत्यांना रात्री भेट मिळाली नाही. त्यांना सकाळी बोलावल्याचे समजले आहे. मविआला यश मिळत असल्याचे पाहून ते राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी राज ठाकरेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेत्यांवर निशाणा साधताना केला.