क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road News : सायबर सावधगिरीचा मंत्र! Kankiya International School मध्ये जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार

Mira Road Cyber Crime Awareness : सोशल मीडिया वापरामध्ये दक्षतेचे महत्त्व अधोरेखित

मिरारोड | सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या संकल्पनेतून आज मिरारोड पूर्व येथील Kankiya International School मध्ये सायबर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये एकूण 410 उपस्थित श्रोत्यांमध्ये 100 विद्यार्थी, 250 पालक, 30 शिक्षक व 30 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विविध सायबर गुन्ह्यांचे प्रकार, सोशल मिडिया वापरातील सुरक्षितता, तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारी उपायांवर सखोल माहिती देण्यात आली.

गुन्हा घडल्यास कुठे व कसा तक्रार करावी, याबाबतची मार्गदर्शन माहिती देखील देण्यात आली. विशेष म्हणजे सोशल मिडिया वापरताना पाळावयाची आचारसंहिता व सुरक्षित व्यवहारांबाबत पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि वास्तवाधारित मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमास Kankiya International School चे डीन श्री. प्रसाद परदेशी, प्राचार्य श्रीमती शितला प्रभू, श्रीमती भानु फर्नांडिस, आणि श्रीमती मेरी जॉयस जॉन्सन आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सायबर पोलीस ठाण्याचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सायबर सुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0