क्राईम न्यूजमुंबई
Trending

Kandivali Suicide News : ट्युशनसाठी जबरदस्ती, 14 वर्षीय मुलाने इमारतीवरून उडी घेतली!

Kandivali Latest Suicide News : कांदिवलीतील ब्रुक इमारतीतून उडी मारून आत्महत्या; पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू

मुंबई | मुंबईतील कांदिवली Mumbai Kandivali Suicide Case परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय पंत आरती मकवाना या मुलाने ट्युशनला जाण्याच्या वादातून गोंधळलेल्या मनस्थितीत ब्रुक इमारतीच्या वरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कांदिवली पोलिसांनी ADR (Accidental Death Report) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. Mumbai Latest Suicide Case

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजता पंतच्या आईने त्याला ट्युशनला जाण्यास सांगितले. मात्र, पंत त्यास नकार देत होता. आईने ट्युशनला जायचेच आहे असे बजावले, त्यानंतर रागाच्या भरात पंत घराबाहेर पडला. काही वेळातच इमारतीच्या वॉचमनने माहिती दिली की, पंत खाली कोसळला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज, पंतचा मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड्स, तसेच त्याचे मित्रमंडळी यांच्याशी पोलिस चौकशी करत आहेत. सध्या तरी कुटुंबाकडून कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही, तरी पोलिस सर्व शक्य त्या कोनातून तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0