व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व जेष्ठ पत्रकारांचा गौरव सत्कार समारंभ

कळंब (प्रतिनिधी) ; दि.३०/०६/२०२५ रोजी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेने कळंब येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एक स्वताच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण दिले जेणेकरुन पत्रकार हा खरचं लोकशाही चा चौथा स्तंभ आहे समाजातील सर्व प्रकारच्या घटका बद्दल जोमाने आपल्या लेखणीतून परखड पणे भुमिका मांडु शकतो हे या संघटनेने पञकाराना दिलेले बळ आहे असे मत संजय दुधगावकर यांनी यावेळी मांडले.
कळंब येथील पंचायत समितीच्या सभागृहात व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व जेष्ठ पत्रकारांचा गौरव सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव संजय दुधगावकर पुढे असे मनाले कि कळंब तालुक्यातील सर्व पत्रकारांनी महाराष्ट्र राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे देखील मत त्यांनी मांडले. या सत्कार समारंभात पत्रकारांच्या एकुण ३० पाल्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जेष्ठ पत्रकारांचा देखील सन्मानपर सत्कार करण्यात आला.
त्यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय पाटील दुधगावकर जि प माजी अध्यक्ष धाराशिव, हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पवार पोलीस उपविभागीय अधिकारी कळंब, व नायब तहसीलदार भराडीया हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रश्मी मारवाडी महिला विंग प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, उमेश पोतदार कृषी विभाग कळंब, चेतनजी कात्रे शैक्षणिक विंग महाराष्ट्र राज्य, अमर चोंदे कार्यवाहक महाराष्ट्र राज्य, व अशोक शिंदे अध्यक्ष कळंब तालुका पत्रकार संघ प्रामुख्याने यांची उपस्थिती होती. या सर्वांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळेस सौ. संगीता वनकळस यांची महिला विंग जिल्हाध्यक्ष धाराशिव पदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य, पत्रकार बांधव, भगिनी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशी महाराज मोहेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार, सुधाकर रणदिवे यांनी केले. या हा कार्यक्रम साठी रामरतन कांबळे, सतिश तवले, शिवप्रसाद बियाणी संजय कवडे, सुधाकर रणदिवे अदि जनानी परिश्रम घेतले.



