Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून मुंबईत 15 टक्के पाणी कपात
- उद्या (20 मार्चला) ठाण्यात बारा तासासाठी पाणी बंद, ठाणेकरांना पाणी भरून ठेवा
मुंबई :- उन्हाचा तडाका आणि यंदाच्या हंगामात कमी पाऊस झाल्यामुळे धरणे 100% न भरल्यामुळे महानगरपालिकेने उपाययोजना म्हणून पाणी कपातीचे धोरण स्वीकारले आहे मुंबईत आजपासून १५ टक्के पाणी कपात लागू केले असून उद्या ठाण्यात बारा तासासाठी पाणी बंद राहणार आहे त्यामुळे ठाणेकरांनो पाणी जपून वापरा तसेच आजच पाणी भरून ठेवा असे आव्हान महानगरपालिकेकडून ठाणे शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे.बुधवारी 20 मार्च 2024 ला ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेतल्यामुळे 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरात होणाऱ्या पाणी पुरठ्यात 30 टक्के कपात होणार आहे. त्यात शहराच्या काही भागात बुधवारी 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्याशिवाय पाणी पुरवठा पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांवर पाणी टंचाईचं संकट ऐन उन्हाळ्यात ओढवलंय. Mumbai Water Cut
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा 250 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा बुधवारी जलवाहिनी स्थलांतरित कामासाठी बंद ठेवणार आहेत. त्यामुळे शहरात 30 टक्के कमी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. बुधवार, 20 मार्चला सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेने ठाणेकरांना केलंय. Mumbai Water Cut