मुंबई
Trending

Mahavikas Aghadi : “महाराष्ट्र विकला जातोय!” – महाविकास आघाडीचा महायुती सरकारवर घणाघात

Mahavikas Aghadi ON MahaYuti Sarkar : “या भ्रष्ट सरकारचा चहा पिणं म्हणजे पाप”; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार

मुंबई : “राज्यात सध्या सरकारच्या नावाखाली लुट सुरू आहे. मुंबई विकली जातेय, नगरसेवकांची उघडपणे खरेदी होतेय, मंत्र्यांचे ड्रायव्हर कोट्यवधींचे मालक होत आहेत Mahavikas Aghadi आणि मराठी भाषेवरही नियंत्रण आणलं जात आहे” – असा घणाघात करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी महायुती सरकारवर MahaYuti Sarkar भ्रष्टाचार, राजकीय अनैतिकता आणि महाराष्ट्रद्वेषाचा गंभीर आरोप केला. राज्य विधानमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावरही विरोधकांनी बहिष्कार टाकला.

अजिंक्यतारा निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत सरकारवर तोफ डागली.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई जिंकता येत नसेल तर ती अदानींच्या घशात घाला – हेच भाजपचं धोरण दिसत आहे. समृद्धी महामार्गावर नदी वाहते आणि शेतकऱ्यांच्या जमिनी उध्वस्त केल्या जातात. सरकार महाराष्ट्रविरोधी अजेंडा राबवत आहे.”

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत म्हटले, “या सरकारमध्ये पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत. शेतकरी वाऱ्यावर आहेत आणि ठेकेदार सुखात. टक्केवारीशिवाय निधी मिळत नाही.”

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ही सत्ता म्हणजे खरेदी-विक्रीची बाजारपेठ झाली आहे. नगरसेवकांचा लिलाव सुरू आहे आणि हे सरकार महाराष्ट्राच्या राजकीय अधःपतनाला जबाबदार आहे.”

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत बंटी पाटील यांनी सांगितलं की, “हा महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम करणार आहे आणि 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे.”

प्रत्येक मंत्र्यावर नावानिशी आरोप झाले, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव मात्र पत्रकार परिषदेत घेतले गेले नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत आठवण करून देण्यात आली, पण शासनकर्त्यांना थेट प्रश्न टाळण्यात आले.

अखेर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असा निर्वाणीचा इशारा दिला की, “या भ्रष्ट सरकारचा चहा पिणं म्हणजे पाप. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहावरील चहापानावर आम्ही बहिष्कार घालतो.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0