Share Market Fraud : ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये लाखोंची गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक
Share Market Online Fraud : चार लाख 40 हजार रुपयांच्या गंडा, राबवडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांकडून आरोपीचा शोध.
ठाणे :- शेअर मार्केटच्या Share Market Fraud नावाखाली ऑनलाइन फसवणूक करण्याची गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना ठाण्याच्या राबोडी परिसरात एक घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये चार लाख 40 हजार रुपयाची गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
फिर्यादी संदिप हरिश्चंद्र जाधव, (38 वर्षे) ठाणे पश्चिम यांना अनोळखी मोबाईलधारक महिला आणि व्यक्ती यांनी व्हॉट्स ॲपमध्ये मॅसेज करून वेगवेगळया कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखविले. त्यांनतर फिर्यादी यांना ऑनलाईन एकुण 4 लाख 40 हजार रूपये रक्कम आरोपी यांचे विविध बँक खात्यात पाठविण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. राबोडी पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द भा.द.वि.कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.