पुणे
Trending

Chandrabhaga River:  चंद्रभागा संतांच्या प्रतीक्षेत… पण नदीत वाढलेला रौद्र प्रवाह भाविकांसाठी धोक्याचा इशारा!

Ashadhi Wari Pandharpur : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत उजनी व वीर धरणांमधून विसर्ग; मंदिरं आणि वाळवंट पाण्याखाली

पंढरपूर | पंढरपूर नगरीत आषाढी एकादशीचे उलटू घड्याळ सुरू असताना, चंद्रभागा नदी मात्र संतांच्या व भाविकांच्या स्वागताआधीच रौद्र रूप धारण करत आहे. Ashadhi Wari Pandharpur पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील अविरत पावसामुळे उजनी धरणातून तब्बल 41,600 क्युसेक आणि वीर धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, संपूर्ण भीमा खोऱ्यातून पाण्याचा जोरदार ओघ चंद्रभागेकडे धाव घेत आहे.

या विसर्गामुळे चंद्रभागेतील वाळवंट, घाट परिसर आणि मंदिर परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. भाविकांची गर्दी वाढत असताना, पाण्याच्या वाढत्या पातळीचा अंदाज येणे कठीण ठरू शकते, म्हणून प्रशासनाने भाविकांना “स्नान न करता फक्त पाय धुवा” असा सुसंस्कृत इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला पूरस्थिती टाळण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार उजनी धरणाची पातळी 70% वर राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पावसाचा जोर न थांबल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणे हे मोठे आव्हान बनले आहे. नदीपात्रातील विसर्ग 40,000 क्युसेकच्या पुढे गेला असून, यामुळे धोका अधिक वाढला आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले असून, कोळी समाजातील 40 अनुभवी जलदूत यंत्रणेत सहभागी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, पालख्या मार्गस्थ असून, पंढरपूर दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी जलतांडवाकडे दुर्लक्ष न करता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0