मुंबई
Trending

Sharad Pawar : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांचा संकेत – “एकत्र लढण्याची आमची इच्छा आहे!”

Sharad Pawar News : “मुंबईत उद्धव ठाकरेंचे प्राबल्य; एकत्र लढायचं का नाही हे बसून ठरवू” – स्थानिक निवडणुकांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा स्पष्टवक्ता

पुणे | राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आम्ही अद्याप काही निश्चित केलं नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला असून, साधारणपणे 3 महिन्यांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. याबाबत आम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आणि शेतकरी कामगार पक्षासोबत एकत्र बसून चर्चा करू. पण आमची इच्छा निवडणुका एकत्र लढण्याची आहे,” असं स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं.

मुंबई महापालिकेबाबत भूमिका ठरवणार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, “मुंबईत उद्धव ठाकरेंचं प्राबल्य आहे, त्यामुळे एकत्र लढायचं की नाही हे बसून ठरवू. शिवसेनेची ताकद इथे सर्वाधिक आहे, त्याचा विचार करूनच पुढील निर्णय होईल.”

त्यांनी स्पष्ट केलं की अद्याप कुठलीही ठोस चर्चा झाली नसली तरी एकत्र लढण्याच्या भूमिकेला प्राधान्य देण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे.

राजकीय हालचालींना वेग

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नवा राजकीय गणितं तयार होऊ लागली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील संभाव्य युतीचं चित्र अजूनही स्पष्ट नाही. मात्र, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे या आघाडीच्या शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0