मुंबई
Trending

Uddhav Thackeray : “ब्रँड विरुद्ध बोलबच्चन” : ठाकरे-फडणवीस रणसंग्राम चिघळतो!

Uddhav Thackeray : ठाकरे म्हणतात – “भाजपचं नामोनिशाण पुसू”;फडणवीसांचे प्रत्युत्तर – “बोलबच्चनांना उत्तर देत नाही!”

जळगाव | राजकारणातील ‘ब्रँड वॉर’ पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात गाजू लागला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी भाजपवर जोरदार घणाघाती टीका केली. “शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड जर कोणी पुसायचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्राच्या मातीवरून तुमचं अस्तित्वच मी संपवेन”, अशा थेट शब्दांत त्यांनी भाजपला इशारा दिला.

पण ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याऐवजी थेट टाळाटाळ केली. जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी बोलबच्चनांना उत्तर देत नाही!” त्यांनी ‘बोलबच्चन’ हा शब्द वापरून ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

दरम्यान, ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीवर सूचक वक्तव्य करत म्हटलं होतं की, “मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून मालकाचे नोकर भेटीगाठी घेतात”. यावरही फडणवीसांनी मौन राखलं.

याचवेळी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमध्ये फडणवीस जळगाव दौऱ्यावर आले होते. मात्र खडसे यांच्या भेटीबाबत विचारलं असता, “मला काही माहिती नाही,” असं त्यांनी साभिप्राय उत्तर दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0