मुंबई

Mumbai Crime News : 2 कोटींच्या ‘एम.डी.’सह 3 जणांना अटक! घाटकोपर आणि अंधेरीत अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

1.18 किलो मेफेड्रॉन जप्त; मुंबईत मोठ्या प्रमाणावर तस्करी उघड

मुंबई | महानगराच्या काळ्या बाजारावर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने घाटकोपर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) परिसरात सापळा रचून एकूण 1.18 किलो मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. या कारवाईत 2.03 कोटी रुपये किंमतीचा साठा हस्तगत करत तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

घाटकोपरहून सुरुवात, अंधेरीत पकडला मुख्य खेळाडू

31 मे 2025 रोजी, घाटकोपर बस स्थानकाजवळ पोलिस गस्तीदरम्यान दोन तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून अनुक्रमे 257 ग्रॅम आणि 156 ग्रॅम एम.डी. हा अत्यवस्थ आणि प्रतिबंधित अंमली पदार्थ आढळून आला. घाटकोपर पोलिसांनी तातडीने एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

त्यानंतर अटक आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांच्या टोळीतील आणखी एक साथीदार अंधेरी पश्चिमेकडील परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित सापळा रचत त्या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल 605 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला.

या तिन्ही अटक आरोपींकडून मिळालेल्या एकूण 1.18 किलो अंमली पदार्थाची बाजारमूल्य अंदाजे 2.03 कोटी रुपये इतकी आहे. हे तस्कर मुंबईच्या उपनगरांमध्ये एम.डी.चे नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

त्यानंतर अटक आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांच्या टोळीतील आणखी एक साथीदार अंधेरी पश्चिमेकडील परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित सापळा रचत त्या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल 605 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला.

देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0