क्राईम न्यूजमुंबई
Trending

Panvel Waterfall News : धबधब्यांच्या मोहात जीव गमावू नका! – पनवेलमध्ये पोलिसांचा कठोर बंदोबस्त

Panvel Waterfall News : पांडवकडा, वाघोली, कर्नाळा परिसरात पर्यटकांची गर्दी, मात्र पोलिसांचा सज्ज नजर

पनवेल | पावसाळा सुरू होताच निसर्गप्रेमींची पावले पनवेलच्या धबधब्याकडे वळतात. Panvel Waterfall News विशेषतः खारघरमधील पांडवकडा आणि ग्रामीण पनवेलमधील विविध लहानमोठ्या धबधब्यांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी Panvel Police News यंदा अधिक सतर्क भूमिका घेतली आहे.

शनिवार आणि रविवारी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली 15 पोलीस कर्मचारी विविध प्रवेशमार्गांवर तैनात होते. यामुळे अनेक पर्यटकांना धबधब्याच्या अगदी जवळ जाण्यापासून रोखण्यात यश आले. गेल्या काही वर्षांत पांडवकड्याजवळ 14 हून अधिक तरुणांनी जीव गमावला आहे. त्यामुळे यावर्षी पोलिसांनी धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदी अधिक काटेकोरपणे राबवली.

दरम्यान, पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देहरंग, मोरबे, वाघोली, कुंडी, साईगाव, हरिग्राम, धोदाणी आणि कर्नाळा किल्ला परिसरातही वर्षासहल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० पोलीस कर्मचारी आणि २ अधिकारी रविवारी विशेष बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले.

“पर्यटनाला आमचा विरोध नाही, पण जीव धोक्यात घालून केलेले पर्यटन टाळा. सुरक्षित सहलीसाठी पर्याय उपलब्ध आहेत, नागरिकांनी पोलीस बंदोबस्ताला सहकार्य करावे,” असे आवाहन घाडगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0