Dahisar Polo News : ‘ना’ म्हटलं म्हणून महिलांवर अश्लील सूड,सोशल मीडियावर 13,500 महिलांचे फोटो जपले, 11 फेक प्रोफाइल, 100 बनावट ईमेल आयडी

Dahisar Police Latest News : दहिसर पोलिसांची कर्नाटकमध्ये कारवाई; सायबर विकृत शुभम कुमार अखेर जेरबंद!
मुंबई | इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली म्हणून महिलांवर अश्लील सूड घेणाऱ्या विकृत तरुणाला अखेर दहिसर पोलिसांनी Dahisar Police पकडलं आहे. आरोपी शुभम कुमार (25 वय), मूळचा बिहारचा असून बेंगळुरूमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होता. पण ऑनलाईन तो महिलांसाठी एक ‘सायबर हैवान’ ठरला होता. Mumbai Latest Cyber Crime News
शुभमने 11 महिलांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम प्रोफाईल तयार केल्या होत्या. त्या खात्यांवर तो अश्लील फोटो, मॉर्फ केलेल्या प्रतिमा, आणि विकृत मेसेज टाकून त्या महिलांना सेक्स वर्करप्रमाणे सादर करत होता.
दहिसर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान, आरोपीच्या मोबाईलमध्ये तब्बल 13,500 महिलांचे फोटो आढळून आले. तो हे फोटो काळजीपूर्वक साठवत होता. याशिवाय, त्याने 100 हून अधिक बनावट ईमेल आयडी तयार करून सोशल मीडियावर गुन्हेगारी जाळं उभारलं होतं.
“न्यूड व्हिडिओ कॉल दे नाहीतर…”
शुभम इंस्टाग्रामवर महिलांना अश्लील मेसेज करत असे. तो न्यूड कॉल देण्याची मागणी करत असे, आणि नकार दिल्यास त्यांची छबी मलिन करत असे. अनेक महिलांनी त्याचे मेसेज ब्लॉक केल्यावर तो त्यांच्या फोटोचा गैरवापर करून, त्यांना ऑनलाईन ‘बदनाम’ करत होता.
एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर फाटला पर्दा
31 जानेवारी 2025 रोजी एका विद्यार्थिनीने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, तिच्या नावाने कुणीतरी इंस्टाग्रामवर अश्लील खोटं अकाउंट तयार केलं आहे. पोलिसांनी फेसबुक आणि गुगलकडून तांत्रिक माहिती मिळवून बेंगळुरूमध्ये सापळा रचून शुभमला अटक केली.
आता पोलिसांनी त्याच्याकडील सर्व डिजिटल डिव्हाइसेस ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. या तपासातून आणखी अनेक महिलांची नावे समोर येत असून सायबर गुन्ह्यांचं हे जाळं खूप मोठं असण्याची शक्यता आहे.


