ACB Trap News : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामासाठी पंचायत समन्वयकाची 5 हजारांची लाच मागणी – लाचलुचपत विभागाची कारवाई

Chatrapati Sambhaji Nagar Bribe News : घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या बिलावर टिपणीसाठी लाचेची मागणी
छत्रपती संभाजीनगर | बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेल्या विलास भुमा चव्हाण या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 मधील तालुका समन्वयकाविरुद्ध लाच मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. Chatrapati Sambhaji Nagar Latest Bribe News
तक्रारदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे, मौजे कोल्हेर येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामासाठी 4 लाख 82 हजार 324 रुपयांच्या अंतिम बिलावर टिपणी करून सही करण्यासाठी विलास चव्हाण यांनी 5 ते 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.
शुक्रवार (6 जून 2025) रोजी तक्रारदाराने यासंबंधी तक्रार बीड लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. गेवराईतील पंचायत समिती कार्यालयात झालेल्या पडताळणीदरम्यान लोकसेवक चव्हाण यांनी लाचेची मागणी करत ती रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नसल्याचे अहवालात नमूद आहे.
कारवाईदरम्यान चव्हाण यांच्या अंगझडतीत 570 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल सापडला आहे. सध्या त्यांच्या घराची झडती सुरू असून मोबाईल ताब्यात घेऊन तपास केला जात आहे. त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, अनिल शेळके, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांच्या पथकाने केली. तपासासाठी मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव व पर्यवेक्षण पोलीस उप अधीक्षक सोपान चिटमपल्ले यांनी केले.



