महाराष्ट्र

Ratnagiri Rain Update : रत्नागिरीला पावसाचा तडाखा! सहा तालुक्यांमध्ये पुराचे थैमान

Ratnagiri Rain Update : गुहागर व राजापुरमध्ये पुराचे पाणी घरांत शिरले, नागरिकांची झोप उडाली

रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, गुहागर व राजापुरसह सहा तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत ढगफुटीचा अनुभव येत असून, कंबरभर पाण्यामुळे अनेक घरांत पाणी शिरले. Ratnagiri Latest Rain Update

गुहागर तालुक्यातील पालशेतमध्ये पावसामुळे 15 पेक्षा अधिक घरांत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठ जलमय झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तहसीलदार परिशित पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना दिलासा दिला.

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; दरडीमुळे वाहतूक एकेरी, बाजारपेठा जलमय

दरम्यान, लांजा तालुक्यात वाकेघाटात दरड कोसळून संरक्षक भिंत ढासळली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन एकेरी करण्यात आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात बसस्थानक परिसर चिखलानं भरला असून, बाजारपेठेत शिरलेल्या पाण्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालं आहे. डोंगर खचल्याच्या घटना आणि शाळांमध्ये पाणी शिरल्यामुळे शैक्षणिक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. राजापुरमध्ये कोदवली व अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडून बाजारात पाणी घुसल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1021 मिमी पावसाची नोंद झाली असून, लांजा (139 मिमी) व गुहागर (136 मिमी) येथे सर्वाधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0