मुंबई

Nalasopara Crime News : दुपारी खून… संध्याकाळी पोलिसांच्या जाळ्यात! गॅस सिलेंडरने डोक्यात मारून निर्घृण खून

•चप्पल फेकून आरोपी पळाला, पण नायगाव पोलिसांच्या ससेमिरा टाळू शकला नाही!

नालासोपारा | नायगाव ‌वारसी हॉटेलमधील आर्थिक व्यवहारातून सुरू झालेला वाद एका निर्दय खुनात बदलला… आणि या गुन्ह्यातील दोघा आरोपींचा अवघ्या 2 तासांत छडा लावून नायगाव पोलिसांनी थरारक कारवाईत त्यांना गजाआड केले!

दुपारी 3.30 वाजता सागपाडा, ई.डी. इस्टेट येथील वारसी हॉटेलमध्ये संजय प्रजापती (वय 35) याची त्याच हॉटेलच्या मालक मोहम्मद हसीम ऊर्फ मौलाना व त्याचा साथीदार रईस ऊर्फ लोधे शेख यांच्याशी व्याजाच्या पैशावरून जोरदार बाचाबाची झाली. वाद एवढा टोकाला गेला की, दोघांनी मिळून संजयच्या डोक्यात गॅस सिलेंडरची टाकी मारल्याने– जागीच मृत्यू झाला होता.

ही घटना 8 जून रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सागपाडा येथील वारसी हॉटेलमध्ये घडली. गुन्हा करून आरोपी रईस ऊर्फ लोधे शेख हा घटनास्थळी चप्पल टाकून कपडे बदलून पळून गेला होता. त्याच्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी चिचोंटी, सातिवली व वसई पश्चिम परिसरात शोधमोहीम राबवली. संशयास्पद हालचालीमुळे रईसला अटक करण्यात आली.

कौशल्यपूर्ण चौकशीत रईस व त्याचा साथीदार मोहम्मद हसीम ऊर्फ मौलाना यांनी संजयच्या खुनाची कबुली दिली. पोलिसांनी लगेच मौलानालाही अटक केली. सदर दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल असून, तपास पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मधुकर पाण्डेय पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त परीमंडळ-2 वसई, नवनाथ घोगरे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, विजय कदम वरीष्ठ पोलीस निरीक्षक नायगाव पोलीस ठाणे, अभिजीत मडके पोलीस निरीक्षक (गुन्हे), रोशन देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, गणेश केकान – , अशोक सकपाळ – पोलीस उपनिरीक्षक, सुनिल पाटील – पोलीस हवालदार, महेश बोडके , दिंगबर काळे , सचिन ओलेकर , सचिन मोहिते , सचिन खंताळ पोलीस अंमलदार जयवंत खंडवी , अमर पवार , चेतन ठाकरे, अशोक पाटील , पांडुरंग महाले, राजेंद्र काकडे यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0