मुंबई

Former CM Vijay Rupani : अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान कोसळले; विजय रुपाणीही होते विमानात!

•Air India Plane Crash लंडनकडे जाणाऱ्या विमानाचा अपघात, 242 प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्रीही

ANI :- गुरुवारी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडिया कंपनीचं लंडनकडे जाणारं विमान कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते आणि विशेष म्हणजे त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी हेही उपस्थित होते.

अपघातानंतर त्यांच्या विमानातील उपस्थितीची पहिली प्रतिमा समोर आली असून ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण प्रशासन सतर्क झालं आहे, आणि बचावकार्य वेगानं सुरू आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

डीजीसीएच्या माहितीनुसार, बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच खाली घसरत गेले आणि मेघाणी नगरातील रहिवासी भागात कोसळले. पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी सांगितले की, “सध्या आम्ही हताहतांची आकडेवारी गोळा करत आहोत.” दरम्यान, अग्निशमन अधिकारी जयेश खडिया यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.

एअर इंडियाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आज दिनांक 12 जून 2025 रोजी AI-171 अहमदाबाद-लंडन उड्डाण करणारे विमान अपघातग्रस्त झाले आहे. सध्या अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरू असून लवकरच पुढील अपडेट्स अधिकृत वेबसाईट आणि ‘एक्स’वर दिली जातील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0