क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

Sangali Crime News : वटपौर्णिमेच्या रात्री ‘साजिरी सवाष्ण’ बनली खुनी पत्नी! झोपेत नवऱ्याचा कुऱ्हाडीने शिरच्छेद

Sangali Latest Crime News : मंगलसूत्राच्या गाठी अजून घट्ट झाल्याही नव्हत्या, आणि लग्नाच्या 18व्या दिवशीच झाला मृत्यूसोहळा!

सांगली | वटपौर्णिमा – सोज्वळ सवाष्णीच्या सणाच्या रात्री सांगलीतल्या कुपवाडमध्ये घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. विवाहानंतर केवळ 18 दिवसांमध्ये एका नवविवाहितेने आपल्या पतीला झोपेत असताना कुऱ्हाडीने शिरच्छेद करून ठार केल्याचं समोर आलं आहे! Sangali Latest Crime News

23 मे रोजी साताऱ्याची राधिका लोखंडे आणि अनिल लोखंडे यांचं लग्न थाटात पार पडलं होतं. पण संसार फुलायच्या आधीच दुःस्वप्न सुरू झालं. 10 जूनच्या मध्यरात्री, नवरा-बायकोमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आणि त्याचा शेवट अनिलच्या मृत्यूत झाला. रात्री 12.30 वाजता अनिल झोपला असताना राधिकाने त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप घाव घालून जागीच संपवले!

खून केल्यानंतर राधिकाने चुलत भावाला कॉल करून माहिती दिली. MIDC पोलिसांनी तत्काळ तिला अटक केली असून, न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस निरीक्षक दीपक भंडवलकर यांनी सांगितले की, “घटनेमागे कौटुंबिक वाद हेच प्रमुख कारण दिसून येत आहे. आरोपीविरुद्ध BNS कलम 103(१1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0