Maharashtra IAS Transfer: आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नितीन पाटील यांच्याकडे कापूस महासंघाची जबाबदारी

Maharashtra IAS Transfer: आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे ओबीसी बहुजन कल्याण विभागाचा सचिवपदाचा कार्यभार
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आली असून, आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.या बदल्यांमध्ये काही महत्त्वाच्या खात्यांतील जबाबदाऱ्यांची फेरफार करण्यात आली आहे.
वरिष्ठ आयएएस अधिकारी नितीन पाटील यांची बदली राज्याच्या कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकपदी करण्यात आली आहे. राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या पदावर नितीन पाटील यांची नियुक्ती प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
दुसरीकडे, आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे राज्याच्या ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि समतेच्या दृष्टीने या खात्याचे विशेष महत्त्व असून, त्यांच्या नियुक्तीमुळे धोरणात्मक कामकाजाला नवे बळ मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
- नितीन पाटील (IAS:SCS:2007) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- ए.बी. धुळाज (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- लहू माळी (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- मानसी (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


