Ramzan Shaikh : राष्ट्रवादी नेते रमझान शेख यांच्यातर्फे नागरिकांना छत्र्यांचे मोफत वाटप

पनवेल जितिन शेट्टी : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव रमझान शेख यांच्या तर्फे नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणाऱ्या छत्र्यांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, ठाणे जिल्हा सचिव सचिन कुऱ्हाडे, राजेश कदम, फुलबानो पटेल, मनीषा पाटील, इस्माईल शेख, रुबीना शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसाळ्याच्या तोंडावर “मोफत छत्र्यांचे वाटप” हा एक महत्त्वाचा आणि जनहितकारी उपक्रम ठरतो. विशेषतः गरजू, विद्यार्थी, रस्त्यावर काम करणारे मजूर, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा उपक्रम खूपच फायदेशीर ठरतो. राष्ट्रवादी नेते महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव रमझान शेख यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकतेचा संदेश जातो, असे सांगितले. पावसाळ्याच्या सुरुवातीला केलेले हे मदतीचे पाऊल अनेकांसाठी उपयोगाचे ठरते. अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांमध्ये समतेची आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली.


