मुंबईमहाराष्ट्र
Trending

Corona Cases In Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर! 86 नवे रुग्ण, 4 मृत्यू

  • नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पॉझिटिव्ह; घरीच क्वारंटाईन
  • राज्यात 435 रुग्ण बरे, पण नागरिकांना सरकारचा इशारा – “सावध राहा!”

Corona Cases In Maharashtra: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतो आहे. मंगळवारी एकाच दिवशी 86 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, 435 रुग्णांनी कोरोवर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 590 वर आली आहे.

Nashik News : नाशिकचे शिवसेना (शिंदे गट) खासदार हेमंत तुकाराम गोडसे Hemant Godse हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून माहिती दिली की, “माझा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घरीच क्वारंटाईन आहे. काही दिवस प्रत्यक्ष भेटी टाळाव्या लागतील याबद्दल क्षमस्व.” त्यांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. Corona Cases In Maharashtra

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 26, पुण्यात 27, ठाणे 9, नवी मुंबई 6, पिंपरी-चिंचवड 3, कोल्हापूर 2, सांगली 5 आणि नागपूरमध्ये 2 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यूच्या घटनेत नागपूरमध्ये 2, मिरजमध्ये 1 आणि चंद्रपूरमध्ये 1 रुग्णाचा समावेश आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे आणि एकूण 12,880 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील 959 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी सर्वाधिक 509 रुग्ण मुंबईत आढळले आहेत.

आरोग्य विभागाने इशारा दिला आहे की, राज्यातच नव्हे तर देशभरात आणि काही देशांमध्येही पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे, मास्क घालणे, गर्दी टाळणे आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0