मुंबई
Trending
Mahavikas Aghadi : राज्याच्या ज्वलंत मुद्द्यांवर राज्यपालांशी थेट चर्चा,महिलांच्या हक्कासाठी महाविकास आघाडी आक्रमक; राज्यपालांपुढे पाच ठोस मागण्या
Mahavikas Aghadi Meet Maharashtra Governor : “लाडकी बहीण” योजनेसाठी वेगळा निधी हवा; वैष्णवी प्रकरण सीआयडीकडे सोपवा – शिष्टमंडळाची मागणी
मुंबई | महाविकास आघाडीच्या महिला नेत्या आज राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन राज्यातील गंभीर सामाजिक आणि प्रशासनिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली. Mahavikas Aghadi Meet Governor तब्बल 55 मिनिटांच्या या बैठकीत त्यांनी पाच महत्त्वाचे मुद्दे मांडून राज्यात महिलांविषयक धोरणात्मक दुर्लक्षावर राज्यपालांचे लक्ष वेधले.
या शिष्टमंडळात शिवसेनेच्या सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, जयश्री शेळके; राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे, विद्या चव्हाण; आणि काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचा समावेश होता.

पोलिस हस्तक्षेप, महिला सुरक्षेचा अभाव, आणि शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर
- राज्यभरातील महिलांच्या सुरक्षेचा अभाव, पोलिस यंत्रणेतील हस्तक्षेप, बेपत्ता महिलांची वाढती संख्या आणि सरकारी योजनांच्या निधीचा गैरवापर हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
- शिष्टमंडळाने वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याची मागणी केली असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची मालमत्ता चौकशी करावी, असे ठणकावून सांगितले.
- “लाडकी बहीण” योजनेसाठी स्वतंत्र निधी ठेवावा**, आणि सारथी-महाज्योती सारख्या संस्थांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबवू नये, असा आग्रह त्यांनी धरला.
- याशिवाय पुणे जिल्ह्यातील अनधिकृत पगारांवर कारवाई, ड्रग्स विरोधी मोहिमेला गती आणि राज्य महिला आयोगाचे राजकीय वर्चस्वमुक्त पुनर्गठन करण्याची मागणीही मांडण्यात आली.
- महिला सुरक्षेसाठी “विशेष शोध कक्ष” स्थापन करण्याची मागणी**ही यावेळी करण्यात आली.
- महिलांच्या मुद्द्यांवर आघाडी सरकार गंभीर असून पुढील टप्प्यात आंदोलनाचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.



