
Thane ATS News ; ठाणे न्यायालयाने संशयित अभियंत्याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले; ‘सिंघल सर’वर संशयाची सुई!
ठाणे :- मुंबईच्या संरक्षण यंत्रणेत खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Thane ATS Latest News कळवा येथे राहणारा 27 वर्षीय कनिष्ठ अभियंता रवी वर्मा याला भारतीय नौदलाच्या संवेदनशील गोदीची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. त्याला ठाणे न्यायालयाने 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या प्रकरणामागे ‘हनीट्रॅप’चा गुंतागुंतीचा खेळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. Thane Breaking News
एटीएसच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्मा सोशल मीडियावर एका महिलेच्या संपर्कात होता. हळूहळू त्या संवादातून विश्वास जिंकून, तिने वर्माकडून नौदल गोदीचे नकाशे आणि छायाचित्रे मिळवली, असा आरोप आहे.पारंपरिक युद्धांपेक्षा आता सायबर आणि मानसशास्त्रीय युद्धाचं नवं युग सुरु झालंय, याचा हा जिवंत पुरावा मानला जात आहे.
वर्माला अटक करताच न्यायालयात हजर करण्यात आलं.सुनावणीदरम्यान त्याने भीतीने सांगितलं – “मी एटीएसबाबत तक्रार नाही करत, पण मी खूप घाबरलो आहे.”याचप्रमाणे, वर्माकडून मिळालेल्या एका “सिंघल सर” या नावाच्या नोंदीमुळे तपास अधिक गूढ वळणावर गेला आहे. आता तपास यंत्रणा शोध घेत आहेत – हा सिंघल सर नेमका कोण? आणि तो या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार तर नाही ना?
वर्माचे वकील म्हणाले, त्याची पोलीस पडताळणी 2021 मध्येच झाली होती आणि अटक करण्यापूर्वी कोणतीही अधिकृत नोटीस देण्यात आलेली नाही.दुसरीकडे, सरकारी वकीलांनी सांगितलं की, त्याच्या आवाजाचे नमुनेही मिळाले आहेत, जे प्रकरणात महत्त्वाचे ठरू शकतात.
हनीट्रॅपचा वापर करून संरक्षण यंत्रणांमध्ये अशी घुसखोरी होणं ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर इशारा मानला जात आहे. एटीएसचा तपास सध्या वेगात सुरु असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.


