क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Panvel Illegal Hoardings : कळंबोलीत अवैध महाकाय होर्डिंग महापालिकेच्या कृपाछायेखाली?

Panvel Hoardings News : वाहतूक शाखेच्या नाकावर टिच्चून महापालिकेचे डोळेझाक,पावसाळ्याच्या तोंडावर सुरक्षेचे नियम धाब्यावर — भल्यामोठ्या होर्डिंगमुळे जीवितधोका!

पनवेल, :– पनवेल महानगरपालिकेच्या Panvel Municipal Corporation नाकावर टिच्चून, कळंबोलीतील एमजीएम हॉस्पिटलजवळ वाहतूक शाखेच्या अगदी शेजारी एक महाकाय अवैध होर्डिंग उभे राहिले आहे. हे होर्डिंग ना बांधकाम परवानगीनुसार, ना सुरक्षेच्या नियमांनुसार उभारले गेले आहे. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर अशा प्रकारची बेफिकीर उभारणी जीवावर बेतणारी ठरू शकते.

30 फूटांपेक्षा उंच होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या नगररचना आणि बांधकाम विभागाची स्पष्ट परवानगी आवश्यक असते. मात्र या ठिकाणी केवळ जागेची तोंडी परवानगी घेऊन कायद्याला बगल देण्यात आल्याचे बोलले जाते. नियम डावलून होर्डिंग उभारल्याने ना फक्त लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, तर महापालिकेच्या उत्पन्नावरही गदा आली आहे.

धक्कादायक म्हणजे हे भव्य होर्डिंग नेमकं कळंबोली वाहतूक शाखेच्या मागे – कालभैरव ढाब्याजवळ – जिथे दिवसरात्र वाहतूक सुरू असते, तिथे उभारण्यात आले आहे. वाहनचालक, पादचारी यांच्या सुरक्षेचा विचारच न करता उभारले गेलेले हे धूड होर्डिंग एखाद्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते.

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे उत्पन्नाची गळती — पत्रकार असोसिएशनची संतप्त मागणी

या पार्श्वभूमीवर पत्रकार मित्र असोसिएशनने संतप्त प्रतिक्रिया नोंदवत महापालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “हे केवळ नियमभंग नव्हे, तर नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
महापालिकेची भूमिका यावर काय असेल, हे येणारा काळच ठरवेल!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0