क्राईम न्यूजमुंबई
Trending

Ladki Bahin Yojan : लाडकी बहीण योजनेत मोठा फसवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कबूल केल्या घोटाळ्याच्या चुका!

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: संजय राऊतांनी मागितला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा; घोटाळ्याचा आरोप मोठा

मुंबई :- लाडकी बहीण योजनेत अपात्र Ladki Bahin Yojan आणि अनधिकृत लाभार्थ्यांना फायद्याचा गाजावाजा झाल्याचे मोठे खुलासे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहेत. Ajit Pawar On Ladki Bahin Yojana “सरसकट सर्वांना लाभ देणे ही मोठी चूक होती,” असे त्यांनी कबूल करत, यापुढे केवळ गरजू आणि पात्र महिलांना योजना दिली जाईल, असा निर्धारही केला आहे.

सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी या योजनेतील गंभीर चुका मान्य केल्या. मात्र, त्यांची ही कबुली विरोधकांना आक्रमक बनवण्यास कारणीभूत ठरली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर थेट निशाणा साधत, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली गेली होती. परंतु विरोधकांनी ही योजना निवडणुकीपुरती आणि फसवणुकीची असल्याचा आरोप केला होता. आता अजित पवारांच्या कबुलीमुळे या योजनेवर असलेले वाद अधिक भडकले आहेत.

संजय राऊत यांनी या प्रकरणाचा फायदा सरकारवर जोरदार टीका करण्यासाठी घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्नांच्या बाबतीत उदासीन असल्याचा आरोप केला. “राज्याच्या गंभीर प्रश्नांना दुर्लक्ष करीत फक्त राजकीय खेळी खेळली जात आहे,” असे राऊत म्हणाले.

या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, ‘लाडकी बहीण योजना’मुळे सत्ता पक्षावर गंभीर दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0