Pune Police News : साडेतीन वर्षांपासून पोलिसांना चकवत होता… अखेर खराडी पोलिसांच्या सापळ्यात सापडला!
Pune Police Latest News : 3 वर्षं पोलिसांना गुंगावत होता… खराडी पोलिसांच्या मास्टरस्ट्रोकमुळे अखेर जेरबंद! 17 हून अधिक गुन्ह्यांतील फरार आरोपीसह साथीदार अटकेत, सोन्याचे दागिने व चोरीची दुचाकी जप्त, 2.30 लाखांचा एकूण मुद्देमाल उघड
पुणे :- साडेतीन वर्षांपासून पोलिसांच्या यादीत ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेल्या अट्टल गुन्हेगाराचा अखेर खेळखंडोबा झाला आहे. पुणे शहरासह राज्यभरात सोनसाखळी चोरी, खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी, फसवणूक अशा 17 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला फिदा मनुअली इराणी आणि त्याचा साथीदार अली अब्बास फिरोज सय्यद यांना खराडी पोलिसांनी Pune Kharadi Police शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत 2.30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Pune Police Latest Crime News
पुणे, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘चैन स्नॅचिंगचा सिंडिकेट’ चालवणाऱ्या आणि साडेतीन वर्षांपासून पोलिसांना झुलवत राहिलेल्या फिदा इराणी या अट्टल गुन्हेगाराचा शेवटी ‘खेल खतम’ झाला आहे. खराडी पोलिसांच्या अचूक सापळ्यात तो आणि त्याचा साथीदार अली अब्बास सय्यद अखेर अडकलाच! खराडी पोलिस ठाण्यातील गुन्हा मध्ये तक्रारदार दाम्पत्याकडून 90 हजारांची सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी तपास सुरू होता. या गुन्ह्याच्या धागेदोऱ्यांनी पोलिसांना एका आंतरजिल्हा गुन्हेगारी जाळ्यापर्यंत नेले – आणि त्याचा केंद्रबिंदू ठरला फिदा इराणी!
या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांनी संशयित आरोपींना ओळखले. खात्रीशीर माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारांच्या नेटवर्कद्वारे पोलीस हवालदार अमित जाधव आणि पोलीस शिपाई कोद्रे यांना संशयितांच्या हालचालींची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या पथकाने खराडी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली.
1.फिदा मनुअली इराणी (35 वय ) – शिवाजीनगर, पुणे
17 अधिक गंभीर गुन्हे,खूनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, फसवणूक, वाहन चोरी,मोक्का, हत्यार कायदा, कलम 307 सह अनेक गुन्ह्यांत फरार
2.अली अब्बास फिरोज सय्यद (30 वय) – अंबिवली, ठाणे
ठाणे व नवी मुंबईत 17हुन अधिक चैन स्नॅचिंग गुन्हे
दोघांकडून मुद्देमाल हस्तगत
1.सोन्याचे तुटलेल्या मणीमंगळसूत्रांचे तुकडे आणि चैन – 1.70 लाख
2.चोरीची बजाज पल्सर दुचाकी –60 हजार
एकूण जप्त मुद्देमाल – 2.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



