देश-विदेश
Trending

India Aghadi : राजकारणात नवे समीकरण? जानकर यांच्या मंचावर राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव!

India Aghadi Latest News : अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त कार्यक्रमाला ‘इंडिया’ आघाडीचा बहुचर्चित सन्मान

नवी दिल्ली : – राजकारणात नवा रंग भरत असतानाच एका ऐतिहासिक स्त्रीचे नाव केंद्रस्थानी ठरत आहे! राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि भाजपचे माजी सहयोगी महादेव जानकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव एकाच मंचावर दिसणार आहेत.

एकेकाळी भाजप सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेले जानकर सध्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीकडे झुकताना दिसत आहेत. त्यांच्या निमंत्रणाला विरोधकांकडून मिळालेला एकमुखी प्रतिसाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

भाजपला धक्का? जानकरांच्या निमंत्रणाला विरोधकांचा एकजूट प्रतिसाद

जानकर धनगर समाजातील असून, त्यांनी समाजाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्यांवर अधारित हा कार्यक्रम आयोजित केला आहे. “हे निमंत्रण केवळ सन्मानाचे नाही, तर एकतेचे प्रतीक ठरेल,” असे जानकर यांनी म्हटले आहे.

राजद नेते तेजस्वी यादव आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनाही निमंत्रण देण्यात आले असून, त्यांची उपस्थिती अद्याप निश्चित झालेली नाही.

भाजपकडून दूर झाल्यानंतर जानकरांची ही भूमिका राजकीय पुनर्स्थापनेसाठीचा डाव मानली जात आहे. या कार्यक्रमातून एक नव्या राजकीय युतीचा पाया घातला जाणार का, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0