क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Airport News : पोटात लपवून आणले ‘पांढरे विष’; DRI ची मोठी कारवाई, कोकेनसह परदेशी नागरिक गजाआड

Mumbai Airport Latest News : लिबेरियातून मुंबई विमानतळावर दाखल; वैद्यकीय तपासणीत उघड झाला तस्करीचा कट

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज Mumbai Airport Latest News आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तवार्ता विभागाने (डीआरआय) एका परदेशी तस्कराला अटक करून मोठी कारवाई उघडकीस आणली आहे. लिबेरियातून भारतात आलेल्या घानामधील नागरिकाच्या पोटातून तब्बल 50 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या, ज्यामध्ये सुमारे 674 ग्रॅम कोकेन आढळून आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य सुमारे 6 कोटी 74 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

674 ग्रॅम कोकेनसह घानाचा नागरिक पकडला; सहा कोटींपेक्षा अधिक किंमतीचा साठा जप्त

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना प्रवाशावर संशय आल्याने त्याला थांबवून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याच्या पोटात पिवळ्या रंगाच्या कॅप्सूल असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय देखरेखीखाली गोळ्या बाहेर काढल्यानंतर तपासणीत त्या कोकेन भरलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासात आरोपीला या तस्करीच्या बदल्यात मोठी रक्कम मिळणार होती, असे समोर आले आहे. यामागे आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीचा हात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, आरोपीच्या संपर्कातील अन्य व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. डीआरआयच्या या कारवाईमुळे मोठ्या अमली पदार्थ साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0