Pune Crime News : किडनी रॅकेटचा पर्दाफाश: पोर्श प्रकरणातील आरोपी डॉ. अजय टावरे नव्या गुन्ह्यात अडकला!

Pune Police Latest News ; येरवडा जेलमधूनच पुणे पोलिसांनी केली अटक,रूबी हॉल क्लिनिकमधील 15 लाखांच्या अवैध किडनी व्यवहारात सहभाग
पुणे :- पुण्यातील गाजलेल्या पोर्श प्रकरणातील आरोपी आणि ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय टावरे Dr. Ajay Taware यांच्यावर आता किडनी ट्रान्सप्लांट रॅकेट चालविल्याचा गंभीर आरोप झाला आहे. पुणे पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातूनच या नव्या प्रकरणात अटक केली आहे. Pune Latest Crime News
पोर्श अपघात प्रकरणात नाबालिग मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप असलेला डॉ. टावरे आता 2022 मध्ये घडलेल्या अवैध किडनी प्रत्यारोपण प्रकरणातही पोलिसांच्या रडारवर आला आहे. या काळात तो रूबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्यारोपणास मान्यता देणाऱ्या प्राधिकरण समितीचा प्रमुख होता.
या प्रकरणात कोल्हापूरच्या एका महिलेने पुरुष प्राप्तकर्त्याची पत्नी असल्याचे खोटे भासवत किडनी दान केली होती, तर तिच्या मुलीच्या आईने त्या पुरुषाला आपली किडनी दिली. यासाठी तिला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळाले नाहीत म्हणून महिलेने खरी ओळख उघड केली आणि संपूर्ण रॅकेटचा भांडाफोड झाला.
पोलिस तपासात डॉ. टावरेचा थेट सहभाग समोर आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



