मुंबई

Bhayandar Robbery News : 24 तासांत सोनचोरीचा थरारक उलगडा! नवघर पोलिसांचा ‘सोनं’झळक विजय

• “गळ्यात घातलं आणि पळालाच!” – सोनं लंपास करून चोर गेला गुजरातपर्यंत

भाईंदर :- फिल्मी स्टाईलने दुकानात येऊन सोनं गळ्यात घालणं, मोबाईलवर कॉल करण्याचं नाटक करणं आणि क्षणार्धात पसार होणं – ही चोरी फक्त मोठ्या शहरात ऐकायला मिळते. पण ही घटना घडली भाईंदरच्या डी. के. गोल्ड मनीलेंडर्समध्ये! आणि केवळ 24 तासांत नवघर पोलिसांनी गुजरातपर्यंत पाठलाग करत दोघा चोरांना गजाआड टाकलं.

27 मे रोजी दुपारी एक अनोळखी व्यक्ती दुकानात येतो. विकत घेण्याच्या बहाण्याने दोन सोन्याच्या चैन गळ्यात घालतो. अचानक मोबाईलवर बोलतो, “पैसे पाठव!” म्हणतो… आणि पलायन! फिर्यादी मुकेश सेलमनी यांच्या लक्षात येईपर्यंत चोर उडाला होता.

या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात IPC कलम 303(2) नुसार गुन्हा नोंद झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आसबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुकानातील सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या आधारे सुराग मिळवले.आणि मग सुरू झाला गुजरातच्या दिशेने थरार!

राहुलकुमार राउलजी (33 वय) आणि भावीक सोनी (31 वय) हे आरोपी वडोदऱ्याच्या एका गल्लीत सापडले. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण 2 लाख 66 हजार 200 रुपयांची सोन्याची मालमत्ता जप्त करण्यात आली.पोलिस कोठडीत दोघांकडून चोरीस गेलेले संपूर्ण सोनं हस्तगत करण्यात आलं असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0