मुंबई

Navi Mumbai News : “नाईट लाइफ की आड, बारबालांची रासलीला!”

नवी मुंबईतील ‘लेडीज बार’वर धडाकेबाज छापा! गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबईत थेट छापेमारी; 40 बारबाला, 6 वेटर्सवर गुन्हे दाखल!

नवी मुंबई :- नवी मुंबईची रात्र निवांत नसते, इथे काही बार रात्रीच्या अंधारात चक्क कायद्याचं वस्त्र फाडतायत!” — हे म्हणणं कालपर्यंत अफवा वाटत होतं. पण आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः धाड टाकून सत्याचा पर्दाफाश फाडला!

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक तक्रार करत होते — लेडीज बारमध्ये सुरू आहे नग्न नृत्य, मद्यधुंद पार्ट्या आणि बेकायदेशीर वर्तन. पण नवी मुंबई पोलिसांचं ‘मौनव्रत’ काही केल्या सुटत नव्हतं…

शुक्रवारी रात्री अचानक, गृहराज्यमंत्री खुद्द मैदानात उतरले!
‘द रेस बार’, नवी मुंबई येथे रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. आणि जे समोर आलं — ते धक्कादायक होतं!40 बारबाला अर्धनग्न अवस्थेत नाचताना आढळल्या! 6 वेटर्स ग्राहकांना ‘सेवा’ पुरवत होते! “आंबट शौकीन” ग्राहकांची गर्दी, आणि पोलिस मात्र कुठेच नाहीत…

बारमध्ये काही “आंबट शौकीन” ग्राहकांसमवेत बारबालांच्या नृत्याचा आनंद लुटताना गृहराज्यमंत्री व त्यांच्या पथकाला दिसले. पोलीस व मंत्र्यांची एकत्र कारवाई होताच तिथे अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं.नियमित तक्रारी असूनही कारवाई न होणं आणि बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहणं — या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याची निष्क्रियता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

गृह राज्यमंत्री मैदानात… आणि पोलीस कुठं?”
ही कारवाई गृहराज्यमंत्र्यांनी स्वतः केल्याने पोलीस विभागाची निष्क्रियता व संशयास्पद भूमिका चव्हाट्यावर आली आहे.”शहरात कायद्याचा नाही, तर पैशाचा जोर चालतो का?”– गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा संतप्त सवाल

मंत्र्यांनीच छापेमारी केली, तर पोलीस काय करत होते?या प्रकरणी आता नवी मुंबई पोलिसांची कार्यपद्धती आणि बारमालकांशी असलेली साठगाठ यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0