मुंबई

PM Modi : खराब हवामानाचा फटका; पंतप्रधान मोदींचा सिक्कीम दौरा रद्द!

•PM Narendra Modi Sikkim Tour Cancelled : गंगटोकमधील “सिक्कीम 50 वर्षे” सोहळ्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन

ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज गुरुवारी होणारा सिक्कीम दौरा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे रद्द करण्यात आला आहे. सिक्कीमच्या भारतात विलीन होऊन ते 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी गंगटोकमधील पलजोर स्टेडियममध्ये आयोजित सोहळ्याला ते उपस्थित राहणार होते. मात्र आता ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सिक्कीमच्या जनतेला संबोधित करतील.

या दौऱ्यात मोदी यांनी सिक्कीमच्या विकासाशी निगडीत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याचे नियोजन होते. यामध्ये नामची जिल्ह्यातील 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय, ग्यालशिंग जिल्ह्यातील सांगाचोलिंगमधील रोपवे प्रकल्प आणि गंगटोक येथील अटल अमृत उद्यानात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा यांचा समावेश होता. याशिवाय, ‘सिक्कीम 50 वर्षे’ या सोहळ्यानिमित्त एक स्मारक नाणं आणि टपाल तिकीट देखील प्रकाशित करण्यात येणार होतं.

पंतप्रधान मोदी यांचा हा सिक्कीमचा दुसरा दौरा ठरणार होता, परंतु दुसऱ्यांदा त्यांना हवामानामुळे तेथे जाणे शक्य झाले नाही. दरम्यान, त्यांचा इतर तीन राज्यांचा – पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश – दौरा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याचे समजते.

सिक्कीम पोलिसांचे वरिष्ठ अधीक्षक तेनजिंग लोडेन लेप्चा यांनी सांगितले की, मुख्य सोहळा सकाळी 10 ते 11.30 या वेळेत पार पडणार होता. सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती. मात्र आता हा कार्यक्रम डिजिटल माध्यमातून पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0