Jalgaon Breaking News : रस्त्यावरच बाळंतपण! आदिवासी महिलेची बेबंद व्यवस्था पुढे आणणारी धक्कादायक घटना

•केंद्रिय मंत्री व तीन कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; आदिवासी महिला अपमानित
जळगाव :- भव्य इमारती आणि शहरी झगमगाटाच्या पलिकडे अजूनही मूलभूत गरजांसाठी झगडावी लागणारी एक वेगळीच दुनिया आहे. याची जिवंत साक्ष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमडी गावात घडलेली धक्कादायक घटना. येथे एका आदिवासी महिलेला रस्त्यावरच बाळंतपण करावे लागले, कारण अर्ध्या तासाच्या सततच्या प्रयत्नानंतरही रुग्णवाहिका पोहोचली नाही.
महिलेच्या पतीने तिला बाईकवरून रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिला प्रसव वेदना सुरु झाल्या आणि तिथेच रस्त्यावर मुलाला जन्म दिला. या प्रसंगी काही महिलांनी एकत्र येत मदत केली, मात्र आवश्यक सामग्री नसल्यामुळे बाळाची नाळ चक्क दगडाने कापावी लागली – ही घटना बेफिकीर आरोग्य यंत्रणेची काळीज पिळवटून टाकणारी साक्ष आहे.
आपण 2025 मध्ये आहोत, तरीही जर एखाद्या आदिवासी महिलेला अशा अवस्थेत रस्त्यावर बाळंतपण करावं लागत असेल, तर याहून मोठी लाजीरवाणी गोष्ट दुसरी नाही,” असं म्हणत शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. शिवाय, या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिची बदनामी झाली असून, तिला शासनाने भरपाई द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
ही घटना केवळ वैयक्तिक वेदनादायी अनुभव नाही, तर आदिवासी समाजाच्या आरोग्य हक्कांची पायमल्ली आहे. सरकारने तत्काळ पावले उचलून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा या दुर्लक्षित समाजाचा उद्रेक अनिवार्य ठरेल, असा इशारा सामाजिक संघटनांकडून दिला जात आहे.


