Dharashiv ACB Trap News : हद्द मोजणीसाठी मागितले नोटा, लिपिक ढोलेला ‘ला.प्र.वि.’ चा सापळा!”
Dharashiv ACB Trap News : भूमी अभिलेख कार्यालय वाशीतील कारनाम्याचा भांडाफोड; मोबाईलसह रक्कम जप्त, दोन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
धाराशिव :- शासकीय सेवक लोकांसाठी, पण काही जण नोटांसाठी!” – अशीच घटना वाशीतील भूमी अभिलेख कार्यालयात उघडकीस आली, जेव्हा एका 45 वर्षीय लिपिकाने हद्द कायम मोजणीसाठी शेतकऱ्याकडे लाच मागितली आणि ‘ला.प्र.वि.’च्या सापळ्यात अडकला. Dharashiv ACB Trap News
दिगंबर मारुती ढोले (वय 45), हा लिपिक उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वाशी (धाराशिव) येथे कार्यरत होता. तक्रारदाराने त्यांच्या आईच्या नावे असलेल्या गट क्रमांक 444 शेतजमिनीची मोजणीसाठी अर्ज केला होता. 7 मे रोजी मोजणी झाल्यानंतर, हद्द कायम करण्यासाठी ढोले यांनी 3000 रुपयांची मागणी केली. तडजोडीने 2000 रुपये निश्चित झाले.ढोले याने आज दिनांक 27 मे रोजी सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष 2000 रुपये स्वीकारले आणि तितक्यात ‘ला.प्र.वि.’च्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले! त्याच्याकडून रोख रक्कम व एक ओप्पो मोबाईल हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भ्र.प्र. अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वाशी पोलीस ठाण्यात सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. त्याची घरझडती आणि मोबाईल तपासणीही सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विकास राठोड आणि उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वात पार पडली.सापळा पथकात आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी आणि पोलीस नाईक दत्तात्रय करडे यांचा सहभाग होता.



