मुंबई

Thane Health Update : कोरोनाचा पुनरागमन! ठाण्यात युवकाचा बळी, मुंबईत पुन्हा वाढते रुग्णसंख्येचे सावट

“सतर्क राहा, सुरक्षित रहा” – आरोग्य विभागाचा इशारा

मुंबई :- राज्यात कोरोना पुन्हा एकदा सावध चेतावणी देतो आहे! सोमवारी तपासलेल्या 7,830 नमुन्यांपैकी 369 जणांना कोरोनाची लागण झाली असून, मुंबईतच 69 नवीन रुग्ण सापडले आहेत. एकीकडे ही आकडेवारी चिंता वाढवते आहे, तर दुसरीकडे ठाण्यात एका युवकाच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. Thane Latest Covid News Update

या घटनेने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित युवकाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरू केली असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Thane Latest Covid News Update

कोरोनाचे चार बळी – सर्वजण गंभीर आजारी
आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात नोंदवण्यात आलेल्या चार मृत्यूंपैकी प्रत्येक रुग्णास गंभीर आरोग्यविषयक समस्या होत्या. तरीसुद्धा, वाढते रुग्ण आणि मृत्यूंची संख्या ही आपल्या असावधपणाचे द्योतक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको!
सर्दी, खोकला, ताप, दम लागणे यांसारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आरोग्य विभागाने बजावले आहे. “उशीर जीवावर बेतू शकतो,” असा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0