मुंबई
Trending

Mumbai Corona Update : कोरोनाचा पुनर्आगमनाचा इशारा! मे महिन्यात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ; मुंबईत सर्वाधिक बाधित

दोन दिवसांत राज्यात 93 नवीन रुग्ण, पुणे व नवी मुंबईतही वाढते प्रमाण,मे महिन्यात एकट्या मुंबईत 207 रुग्णांची नोंद, प्रशासनाची चिंता वाढली

मुंबई :- राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे संकेत आरोग्य विभागाच्या नव्या आकडेवारीतून मिळत आहेत. मागील दोन दिवसांत राज्यात 93 नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये मुंबईतील 47, पुण्याचे 30, नवी मुंबईतील ७, ठाणे महापालिकेतील 3 आणि नागपूर महापालिकेतील 6 रुग्णांचा समावेश आहे.

जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात एकूण 7,144 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यात 257 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 166 रुग्ण उपचाराधीन असून 87 रुग्णांनी बरे होऊन घरी परतण्यास यश मिळवले आहे.

मुंबईत यंदाच्या वर्षात रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला, मार्चमध्ये एकही रुग्ण नव्हता. मात्र एप्रिलमध्ये 4 आणि मे महिन्यात तब्बल 207 नवे रुग्ण नोंदले गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांनी पूर्वीप्रमाणे खबरदारीचे उपाय पुन्हा अवलंबावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि लक्षणं जाणवल्यास त्वरित चाचणी करून घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0