महाराष्ट्र

Gadchiroli: गडचिरोलीत रक्तरंजित चकमक! माओवाद्यांवर सी-60 चा कहर – चार ठार

Gadchiroli: जंगल दणाणलं गोळीबारानं ; दोन तासांच्या ऑपरेशननं नक्षल मोर्चात खळबळ,छत्तीसगडनंतर महाराष्ट्रातही सुरक्षाबलांचा जबरदस्त प्रतिघात

गडचिरोली – गडचिरोलीच्या घनदाट जंगलात शुक्रवारी (23 मे) सकाळी नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडोंवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. मात्र, सुरक्षाबलांनी संयम राखत तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं आणि तब्बल दोन तास चाललेल्या भीषण चकमकीत चार माओवादी जागीच ठार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुठभेड़ीनंतर परिसरात सखोल शोधमोहीम राबवण्यात आली. त्यात चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व साहित्य जप्त करण्यात आलं आहे – ज्यात एक ऑटोमॅटिक रायफल, दोन .303 रायफल्स, एक भारमार बंदूक, वॉकी-टॉकीज, शिबिर साहित्य व नक्षल साहित्याचा समावेश आहे.

ही कारवाई अत्यंत संवेदनशील काळात घडली आहे. फक्त दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये २७ नक्षलवादी ठार झाले होते. त्यात नक्षलवाद्यांचा मोस्ट वाँटेड नेता बसवराजूही मारला गेला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ही मोठी कारवाई नक्षलवाद्यांसाठी जबरदस्त इशारा मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0